आमच्याविषयी माहिती ( About Us)

रेषा शिक्षण संस्था (रजि.) २०१३ पासून

  • एक पाऊल आनंददायी व शाश्वत शिक्षणाच्या वाटेवर. एक सकारात्मक प्रारंभ... शिक्षणाची सुंदर पहाट... एकवीस वर्षानंतरच्या वाटचालीसाठी आतापासूनच पुरुषोत्तम घडविण्याची जिद्द असणारी आमची संस्था म्हणजे रेषा शिक्षण संस्था.
  • नाशिकमधील असंख्यांपर्यंत सहजपणे पोहचत जाणारी रेषा शिक्षण संस्था. आपल्या संस्थेच्या या कार्याला शिक्षण क्षेत्रातील नामवंत विचारवंत व नागपूरचे शिक्षण महर्षी डॉ. बाबा नंदनपवार, नव्या युगासाठी म्हणून नाविन्यपूर्ण शिक्षणाचा आणि गुरुकुल पद्धतीचा विचार करणारे अभ्यासक श्रीमती कुमुदिनी ताई फेगडे व सौ निर्मल ताई अष्टपुत्रे, ‘ शाश्वत शिक्षण पध्दतीने उद्याची पिढी ’ या विचारांच्या जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्रीमती रोहिणी ताई बलंग यांच्या मार्गदर्शनाने सुरुवात झाली.
  • आमच्या तुमच्या मनातली अगदी हवी तशी मराठी माध्यमाची शाळा ते ही गुरुकुल पद्धतीने सुरु करणे खरं तर धाडसच. पण आम्ही ते केलं. या दृष्टीने आमची पाऊलं अतिशय ठामपणे आम्ही टाकीत आहोत. हे रोप एस. टी. कॉलनी, गंगापूर रोड नाशिक येथे छान वाढतंय , बहरतय.
  • पालकांसाठी सुजाण पालकत्व , महिलांसाठी विविध स्पर्धा, मुलांसाठी किल्ले बांधणी स्पर्धा, वाचनप्रकल्प , १०वी च्या मुलांसाठी सर्वविषयांचे सखोल मोफत मार्गदर्शन कार्यशाळा, परीक्षेसाठीची तयारी, संस्कारवर्ग, जिम्नॅस्टिक वर्ग, भरतनाट्यम, कथक, स्वतंत्र नाट्यविभाग या विभागातून कार्यरत आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या वैज्ञानिक एकांकिका स्पर्धेत यशस्वी सहभाग, असतो. संस्थेच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम सुरु आहेत. आनंदी कुटुंबासाठी ‘ सुंदर माझं घर ’ सारखा उपक्रमही दरवर्षी यशस्वी होतो. हे सारं राबवतांना नजरेसमोर असतो आमचा निरागस पाल्य व पालक. म्हणूनच आम्ही आनंदयात्री ठरतो.
  • आमचा पाल्य नक्कीच पुरुषोत्तम घडेल हा दृढ विश्वास. संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील विविध मार्गदर्शक, सर्व पदाधिकारी आणि सभासदांचे सहकार्य लाख मोलाचे. आपल्या संस्कृतीचे बाळकडू आपल्याच मातीतून, आपल्याच भाषेतून आपल्या संस्कारातून निश्चित देवू शकतो. संस्थेची इयत्ता १ली ते ४थी पर्यंत एक उत्तम मराठी माध्यमाची गुरुकुल पद्धतीने शाळा सुरू झाली आहे.
  • आम्ही आपली वाट बघतोय.तुमचे आशीर्वाद , शुभेच्छा अपेक्षित.

कार्यकारिणी सदस्य

अध्यक्ष

श्रीमती कुमुदिनी ताई फेगडे
ख्या.लेखिका व मा.मुख्यध्यापिका

उपाध्यक्ष

सौ.निर्मल ताई अष्टपुत्रे सेवानिवृत्त शिक्षिका संचालिका :- मनोरमा सुगम संगीत वर्ग

सचिव

श्री मिलिंद कुलकर्णी सा.कार्यकर्ता

खजिनदार

सौ.अर्चना ताई कुलकर्णी सा.कार्यकर्त्या

सदस्य

सौ. सुरेखा ताई बोंडे
आदर्श शिक्षिका

सदस्य

सौ.मृदुला ताई कुलकर्णी
सा.कार्यकर्त्या

सदस्य

कु. चिन्मयी अविनाश शिंदे
एमबीए (फायनान्स)

तज्ज्ञ मार्गदर्शक

सौ.पूजा शिरभाते

आहारतज्ज्ञ
फिटनेस पॉईंट

डॉक्टर अमृता हिरवे

बालरोगतज्ज्ञ

श्री मुकुंद कुलकर्णी

जेष्ठ रंगकर्मी व मार्गदर्शक
लेखक,दिग्दर्शक व अभिनेते

सौ.पुष्पा ताई चोपडे

एम ए (क्लिनिकल सायकॉलॉजी)
उपचारात्मक मानसशास्त्र

डॉ सुमुखी अथणी

नृत्य विशारद, नृत्य अलंकार,
MA (नृत्य), phd (नृत्य)

सौ.सायली दशरथ

स्टोरी टेलर
संचालिका मोई रेषा ग्रंथालय

Get In Touch

Resha Daycare Playgroup Nursery

reshasanstha2019@gmail. com

9850019606 / 9822011967 / 8378997138

Office Timing : 9 Am to 6 Pm

Follow Us

Visitor Counter

© RESHA DAY CARE . All Rights Reserved. Designed by FLYCTSOFTTECH